
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचसोबत त्याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. याप्रकरणी कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार होता. जामीनासाठी त्याने कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
कोल्हापूर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर तो तेलंगणात सापडला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रशांत कोरटकर गेल्या महिनाभरापासून फरार होता. अखेर तेलंगणातून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर पोलिस हे थोड्याच वेळात यासंदर्भातील महत्वाची आणि अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, कोरटकर हा दुबईला पळाल्याची चर्चा होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका-प्रतिटीका झाली होती.
कोरटकरच्या अटकेसंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. थोड्याच वेळात कोल्हापूर पोलिस अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. प्रशांत कोरटकरला महाराष्ट्रात पोलिस आणण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta