Friday , November 22 2024
Breaking News

शिनोळी बु. येथे श्री गणेश दूध डेअरीचे उदघाटन

Spread the love

शिनोळी : शिनोळी बु. (चंदगड) येथे आज राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गोकुळ दूध संचलित श्री गणेश दूध संकलन डेअरीचे उदघाटन केदार फौंडेशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नितीन पाटील होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लक्ष्मी प्रतिमा पुजन अनिरुद्ध रेडेकर यांनी केले. गोकूळचे सुपरवायझर निवृत्ती हारकरे यांनी राजर्षी शाहू महाराज प्रतिमा पुजन केले. संस्थेचे चेअरमन विनोद परशराम पाटील यांनी मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत केले. दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असून व्यवसाय म्हणून करण्यात यावा असे प्रतिपादन केले.
तसेच गोकुळ दुध संघ संचलित या दूध डेअरीला उत्पादक सभासदांनी स्वच्छ निर्भेळ दूध पुरवठा करावा. दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ उत्पादकांनी करून घ्यावा असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच नितीन पाटील यांनी काढले.
यावेळी उपसरपंच रघुनाथ गुडेकर, ग्राम पंचायत सदस्य अम्रत जत्ती, परशराम चु. पाटील, प्रकाश तानगावडे, प्रवीण पाटील तसेच संस्थेचे चेअरमन विनोद परशराम पाटील, व्हा.चेअरमन रवळू मारुती तानगावडे, सदस्य श्रीपदी रामू गुडेकर, मोनेश्री चव्हाण, विष्णू तानगावडे, सौ.सविता अ.जत्ती, सौ.रेखा मारुती पाटील यासह उत्पादक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुत्रसंचालन रघुनाथ गुडेकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध

Spread the love  गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *