अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
बेळगाव : गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फोडून नाल्याचे पाणी थेट शेतात घुसल्याने नुकतेच शेतात मशागत करून भात रोपे तयार करण्यासाठी भाताची पेरणी केली होती ती भात रोपे देखील वाहून गेली आहेत तर काही शेतात वाहून आलेल्या मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुन्हा केव्हा शेताची दुरुस्ती करणार आणि नंतर केव्हा दुबार पेरणी करणार अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
यावेळी अनिल बेनके म्हणाले, जोपर्यंत हे नाले स्वच्छ होत नाहीत तो पर्यंत घराघरांत पावसाचे पाणी येत राहणार यासाठी मी गेल्यावर्षी पासून हे नाले स्वच्छ करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, आणि ते काम करत आहेत, पण मागील चार महिन्यात निवडणूकीमुळे आचारसंहिता व कोरोनामुळे अधिकाऱ्यांची धावपळ यामुळे यावर्षी कुडची रोडवरील नाला ते मुचंडीपर्यंत नाला सफाई जो पर्यंत स्वच्छ होत नाही तो पर्यंत ही समस्या राहणार ही समस्या सोडवण्यासाठी मी पुढील वर्षी प्रयत्न करणार, साध्य जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
यावेळी महानगरपालिकाचे आयुक्त जगदीश, मंजुश्री, सचिन कांबळे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, श्रीधर पद्मन्नावर, अरुण पुजारी, सुनील खन्नूकर, उत्तम नाकाडी, आप्पा मंडोळकर, महेश बडमनजी, कृष्णा पिंगट, राहुल मोरे, पुंडलिक मोरे, आप्पारव भोसले, महेश खतेकर, सुनील अनगोळकर यासह शेतकरी अन्य उपस्थित होते.