बेळगाव : उत्तर मतदारसंघातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार आहेत.
शहर परिसरात जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, बांधवाना भेटण्यासाठी आमदार अनिल बेनके हे शनिवारी सकाळी 10 वाजता दौरा करणार आहेत.
गेल्या चार दिवसांत शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहर भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शहरातील शेतकऱ्यांना बसला आहे. सुरवातीच्या पावसामुळे झालेले नुकसान, पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. अशी माहिती आज महानगरपालिका येथे पूरग्रस्त आढावा बैठकीत अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शहरातील शेतकऱ्यांना बसला आहे, असे सुनील जाधव यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर यावेळी आमदार अनिल बेनके यांनी पाहणी दौरा संदर्भात सांगितले.
यावेळी बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत व तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खन्नूकरसह अन्य शेतकरी उपस्थित होते.