मडगाव : शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी हसत खेळत काव्य संस्थेचा मासिक बहुभाषिक कविसंमेलन संस्थापक तथा संयोजिका प्रसिद्ध कवियत्री पूर्णिमा देसाई यांचे निवासस्थान, साई आसरा, फेडरेशन काॅलनी, रावणफोंड मडगाव-गोवा येथे उत्साहात पार पाडला. एनटीसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ सदस्या तथा गोमंतकीय कवयित्री सौ.माधुरी रंगनाथ शेणवी उसगावकर (फोंडा-गोवा) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यमैफिलीला गोव्यातील नामवंत कवी कवयित्रींनी कविता सादर करुन स्मरणीय असा ठसा उमटवून न भुतो न भविष्यती असा काव्यसंग्राम केला. ह्यावेळी हिंदी दिवसाचे औचित्य साधून कविता, चारोळी, अलक, भक्ती गीत अशा विविध साहित्यकृती सादर केल्या. ह्या कविसंमेलनात दैनिक तरुण भारतचे वृत्त विभाग प्रमुख तथा कवी लेखक श्री. राजू भि. नाईक पणजी, ज्येष्ठ लेखक तथा कवी प्रसाद तुकाराम सावंत सर (कुडतरी), चारोळीफेम कवी अजय जेवळीकर, कवियत्री सुरेखा खेडेकर, (फोंडा-गोवा) ॲड. वल्लभ देसाई (मडगाव), आयडिया एजचे संस्थापक गौरीश नाईक, (मार्शेल), कवियित्री बबिता नार्वेकर फातोर्डा, कवयित्री नागरत्ना कुडतरकर फोंडा, कवयित्री सुष्मिता नाईक गावकर काणकोण, कवयित्री डॉ. जेनेट बोर्जिस पणजी, कवियत्री सोनिया शेटकर, कवियत्री सेनोरिता शेटकर तसेच गोमंतकिय कवयित्री तथा एनटिसी एड्युकॅअर नवचैतन्य समुह सदस्या सुनिता पेडणेकर आ (गोवा वेल्हा) इतरांनी कविता सादर करुन कार्यक्रमात बरीच रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन पूर्णिमा देसाई यांनी केले. शेवटी त्यांनी सर्वांनी आपली उपस्थिती लावून यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.