Tuesday , March 3 2026
Breaking News

अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ‘आप’टले; दिल्लीत मोठा पराभव

Spread the love

 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून सत्ता गेली आहे. 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 25 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे केजरीवाल यांचं काय होणार अशी चर्चा असतानाच आता अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. ‘आप’साठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *