बेळगाव : गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेस समिती निवडणुकीचा निकाल लागला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल जारकीहोळी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत राहुल जारकीहोळी यांनी १ लाख २० हजार मतांच्या फरकाने विजयी झाले असून कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी विराजमान झाले आहेत. या विजयानंतर त्यांच्या समर्थकांसह चाहत्यांनी गोकाकमध्ये जल्लोष करून आनंद साजरा केला.