नवी दिल्ली : भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणा-कोणाच्या नावाची चर्चा होत आहे त्यांची नावे देखील समोर आली आहेत. भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी पुरंदरेश्वरी यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये प्रादेशिक संतुलन, महिला नेतृत्व, दलित प्रतिनिधीत्व आणि संघटन कौशल्य या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये काही दिवसातच निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.