
मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या बेपत्ता हनिमून जोडपे प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणात पत्नी सोनम आणि तिच्या ३ साथीदारांना अटक करण्यात आले आहे. मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रघुवंशी बेपत्ता प्रकरणात दररोज नवनवे ट्विस्ट समोर येत होते, मात्र आता या प्रकरणात पत्नीचाच हात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
राजा रघुवंशी याची हत्या पत्नी सोनम हिनेच घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पत्नी सोमन रघुवंशी आणि तिच्या ३ साथीदारांना उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकल्या आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोनमने नवऱ्याला संपवण्यासाठी ३ जणांना सुपारी दिल्याचे तपासातून समोर आले आहे. मेघालय आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मिळून कारवाई केली असून, सीबीआयकडून तपास सुरू आहे.
इंदूर येथील नवविवाहित जोडप्याच्या मेघालयातील हनीमूनदरम्यान घडलेल्या हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली होती. मेघालयच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) आय. नोंग्रंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरचा रहिवासी राजा रघुवंशी याच्या हत्येमागे त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिचा हात आहे. सोनमने आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी देऊन तीन हल्लेखोरांना पैसे दिले होते. या प्रकरणी सोनमसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला. पोलिसांकडून सोनमच्या या कृत्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
राजा आणि सोनम ११ मे रोजी लग्नबंधनात अडकले होते. मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला होता. २० मे रोजी ते हनीमूनसाठी मेघालयला गेले. मात्र, २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह शोहरा परिसरातील एका खोल दरीत सापडला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील नंदगंज पोलीस ठाण्यात शरण आली. तिच्यासह मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना रात्रीच्या छापेमारीत अटक करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta