Tuesday , March 3 2026
Breaking News

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक

Spread the love

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांची काही दिवसांपूर्वी ४ कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपचे नेते साहिब सिंग यांनी ट्वीट करत जैन यांच्यावर टीका केली आहे. इमानदारीचे ढोंग करत असलेल्या दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना ईडीकडून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे साहिब सिंग म्हणाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *