नाशिक : किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून वादाला तोंड फुटलं. आसन व्यवस्थेवरून सुरू झालेल्या वादाला फोडणी मिळाली आणि सुधीरदास पुजारी यांनी सरस्वती गोविंद गिरींवर माईक उगारला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
दरम्यान, हनुमान जन्माच्या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. त्यांची बैठक सुरू होण्याआधीच राड्याला सुरुवात झाली. आसन व्यवस्था समसमान करण्यात आली नसल्याने काही साधूंना राग आला. स्वामींची अनिकेत शास्त्री यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, गोविंदानंतद सरस्वती स्वामी वर येऊन बसल्याने अन्य साधूंनी आक्षेप घेतला. यामुळे साधूंमध्ये ’खुर्ची’चा वाद सुरू झाला. आसनव्यवस्था समसमान करण्याची मागणी होत आहे. गोविंदानंद सरस्वती यांनी खाली बसावं अशी मागणी करण्यात आली आहे. तुम्ही विद्वान असाल, साधू असाल, मात्र आमचा मान राखावा असं नाशिकच्या साधूंनी म्हटलंय.
शंकराचार्य हे काँग्रेसी
वाद विवाद सुरू असतानाच गोविंदगिरी यांचे गुरू शंकराचार्य यांना सुधीरदास पुजारींनी काँग्रेसी म्हटल्याने वाद चिघळला. गोविंदगिरी यांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली. मात्र बोलता बोलता आवाज चढला आणि सुधीरदासांनी माईक उगारला. यामुळे गोविंदगिरी भडकले आणि उभे राहून माफी मागण्यासाठी आग्रह धरला.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …