Tuesday , September 17 2024
Breaking News

आरबीआरचा दणका; सर्व प्रकारची कर्जे पुन्हा महागली!

Spread the love

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँकेने आज आपलं नवं पतधोरण जाहीर केलं आहे. यामध्ये बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. महिन्याभरातली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता रिझर्व बँकेचा रेपो दर 4.90 टक्के झाला आहे.
रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार आहेत. कारण आता बँकांच्या कर्जाची किंमत वाढणार आहे. रेपो रेट हा असा दर आहे, ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेतात. हा दर वाढल्याने आता बँकांना जास्त दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बँका ग्राहकांकडून चढ्या दराने व्याज घेणार आहेत.
यापूर्वीही रिझर्व बँकेने आपल्या दरामध्ये 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. रेपो दरात यापुढेही आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चलनवाढीचा दर समाधानकारक पातळीवर आणण्याच्या दबावामुळे पॉलिसी रेट वाढवण्याची शक्यताही रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

Spread the love  रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *