Sunday , July 13 2025
Breaking News

पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण करणे अत्यंत गरजेचे : डॉ. हर्षा भानू जी. पी.

Spread the love

प्रगतिशील-एल्गार परिषद, माजी विद्यार्थी संघटना, द.म.शि मंडळ ज्योती-बीके कॉलेजतर्फे वनमहोत्सव व व्याख्यानाचे आयोजन
बेळगाव : जमिन जंगल पाणी हवा निसर्ग त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत काळाची गरज निर्माण झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि निसर्गातील चांगल्या गोष्टींचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे घ्यायला हवे. समाजामध्ये जनजागृती करून पर्यावरण विषयक अभियान राबवण्याची मोठी मोहीम राबविली तर एक व्यापक अशी चळवळ उभी राहू शकते ती उभे करण्यासाठी युवा तरुण-तरुणींनी आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घ्यायला हवा. निसर्ग हा भरभरून देतो त्याचे संवर्धन करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे ते नीटपणे व्यवस्थित हाताळले गेले पाहिजेत. कोरोना काळाच्या वैश्विक महामारीमध्ये निसर्गापुढे कुणाच्याही काही चालू शकत नाही हे दिसून आले याचाच परामर्श घेत आरोग्य हितासाठी चांगले कार्य करण्याची गरज असून पर्यावरण जतन करणे वाढवणे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने प्रामाणिक कार्य करायला हवे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते म्हणून बेळगाव जिल्हा वन संरक्षण अधिकारी डॉ. हर्ष भानु जी.पी. बंगलोर (आयएफएस) यांनी ’पर्यावरण : संवर्धन-संरक्षण आजच्या काळात परिसराचचे महत्व परिणाम आणि उपाय योजना’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद – एल्गार सामजिक साहित्य परिषद बेळगांव, माजी विद्यार्थी संघटना, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, ज्योती पदवीपूर्व महाविद्यालय – भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने ’जागतिक पर्यावरण दिन आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. के. कॉलेजचे ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून एल्गार परिषदचे उपाध्यक्ष पत्रकार कवी श्री. शिवाजी शिंदे, समाजसेवक म. ए. युवा समितीचे खजिनदार मनोहर हुंदरे, ज्येष्ठ समाजसेवक दिपक पावशे, ज्योती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगावचे कवी प्रा. निलेश शिंदे, माजी विद्यार्थी संघटनाचे समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे, प्रा. डॉ. अमित चिंगळी, प्रा.व्ही. वाय. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी परिषदच्या वतीने वृक्षारोपण करून झाल्यानंतर 3000 (तीन हजार) पेक्षा अधिक बीजे लावण्यात आली.
शिवाजी शिंदे म्हणाले; निसर्गाचे देणे माणसांच्या जीवनावर खूप उपकार आहेत. याचे भान ठेवून आपण जैव विविधता टिकविण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. जंगलामध्ये असणार्‍या वनस्पती दुर्मिळ असतात त्यांचे महत्त्व समजायला करून देऊन कृतिशील होण्याची गरज आहे.
श्री. मनोहर हूंदरे म्हणाले, शाळा महाविद्यालय मधील विविध उपक्रम ज्या पद्धतीने आपण राबवतो त्याच पद्धतीने निसर्ग नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये शहरांमध्ये जनजागृती अभियान राबवून परिसर वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
यावेळी स्वागत प्रा. डॉ. अमित चिंगळी, प्रास्ताविक कवी प्रा. निलेश शिंदे, परिचय प्रा. दिलीप वाडेकर व प्रा. व्ही. वाय. पाटील करून दिला. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. एस. आर. चव्हाण व एम. एस. पाटील यांनी केले. माजीविद्यार्थी समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे आभार मानले.
यावेळी प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे, प्राचार्य आनंद पाटील, प्राचार्य बसवराज कोळुचे, प्राचार्य पि. डी. साठम, प्रा. डी. टी. पाटील, प्रा. निता पाटील, प्रा. कविता पाटील, ए. व्ही. सुतार, प्रा. अवधूत मानगे, प्रा. महादेव नार्वेकर, प्रा. राजाराम हालगेकर, प्रा. विजय शिंदे, प्रा. नारायण पाटील, सागर गुंजीकार, सुजाता गुंजिकर, सुधिर लोहार, नागराज पाटील, प्रा. विशाल करंबळकर, प्रा. एस. बी. ताटे, प्रा. एस. एस. काकतकर, प्रा. सुहास बामणे, प्रा. रामभाऊ हुद्दार, प्रा. सूरज पाटील, प्रा. महेश जाधव, जोतिबा नागवडेकर, प्रा. निता पाटील, गणपती कांबळे, प्रा. लक्ष्मण बांडगे, प्रा. संजय बंड, प्रविण पाटील, तसेच परिषद व मंडळाचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक-प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागची बैठक

Spread the love  सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार बेळगाव : म. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *