नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येमधील चढ-उतार कायम असताना एक गूड न्यूज समोर आली आहे. देशातील पहिली कोरोनावरील टॅबलेट ही केंद्रीय औषध प्रयोगशाळाने (सीडीएल) घेतलेल्या गुणवता आणि क्षमता परीक्षणात पास झाली आहे. आता या टॅबलेटची क्लिनिकल ट्रायल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनावरील टॅबलेट ही बंगळूरमधील सिनजिन कंपनीने अमेरिकेवरुन आयात केली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ती बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे. आता क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली तर या टॅबलेटच्या सेवनानंतर कोरोना रुग्णांवर परिणाम दिसून देतील. रुग्ण कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असेही दावा कंपनीने केला आहे.
टॅबलेट बाजारात आल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापासून नागरिकांची सुटका होईल तसेच शरीरात वेगाने अँटीबॉडी तयार होतील. ‘सीडीएल’ कसौलीने या टॅबलेटची गुणवत्ता आणि क्षमतेचे परीक्षण केले. आता ही रुग्णांना उपलब्ध होण्यापूर्वी तिचे आणखी दोन टप्प्यात परीक्षण होणार आहे. याचा अहवाल ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) दयावा लागणार आहे. या टॅबलेटचे परीक्षण सीडीएलमध्ये मे महिन्यात सुरु झाले होते. आता ही पुढील टप्प्यातील परीक्षणात पास झाली तर ती देशातील पहिली कोरोना टॅबलेट ठरणार आहे. या माहितीला सीडीएल कसौलीच्या वेबसाईटवरही दुजोरा देण्यात आला आहे.
१० ऑगस्टपासून होणार दुसरे परीक्षण
आता कोरोना प्रतिबंधित टॅबलेटचे दुसरे परीक्षण १० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. यासाठी औषध कंपनीकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस म्हणून कोविशील्ड, कोवॉक्सीन, स्तुपनिक-व्ही, मोडर्ना, जॉनसन अँड जॉनसर, जायकॉव डी, कोर्बेक्सीन, कोवाक्सीन, स्तुपनिक लाइट या लसीने ‘डीसीजीआय’ने मंजुरी दिली आहे.