Saturday , December 13 2025
Breaking News

तेलंगणातील महबूबनगर येथे पुराच्या पाण्यात बुडालेल्या स्कूल बसमधून 30 मुलांची सुखरुप सुटका

Spread the love

महबूबनगर : तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात आज (8 जुलै) मोठी दुर्घटना टळली. महबूबनगरमध्ये स्कूल बस 30 मुलांना घेऊन जात होती. या दरम्यान, मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यान पुलाखालील पुराच्या पाण्यात ही स्कूल बस अडकली. यामुळे बसमधील 30 मुलांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व 30 मुलांना सुखरुप वाचवले आणि मोठी दुर्घटना टळली. भश्याम शाळेची ही स्कूल बस रामचंद्रपूर, मचनपल्ली, सुगुरगद्दाफी तांडा इथून मुलांना घेऊन महबूबनगर शहरातील भश्याम टेक्नॉलॉजी स्कूलकडे निघाली होती.
सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. स्कूल बस 30 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यानच्या रेल्वेच्या अंडरब्रिजमध्ये बुडाली. पाणी इतकं खोल असेल आणि त्यात बस अडकेल, याची चालकाला थोडीशीही कल्पना आली नाही. चालकाने बस पुढे नेली आणि ती पुराच्या पाण्यात अडकली आणि हळूहळू बुडू लागली. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी तत्परता दाखवून मदतीचा हात पुढे केला, अशी माहिती महबूबनगरचे पोलीस उपायुक्त यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास अर्धी बस पाण्यात बुडाली होती. त्यानंतर चालकाने बस थांबवली. सुदैवाने सर्व मुलांची सुखरुप सुटका झाली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये लोक शाळकरी मुलांना बसमधून बाहेर काढताना दिसत आहेत. तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

१० व्यांदा घेतली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ!

Spread the love  पटना : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहारमध्ये एनडीएने नवीन सरकार स्थापन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *