Tuesday , March 3 2026
Breaking News

केंद्र सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार गुडन्यूज?

Spread the love

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा करण्यात आली नाही. ही घोषणा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होते. मात्र यावेळी उशीर झाल्याने शेतकरी आतूरतेनं याची वाट पाहात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच एमएसपीची घोषणा करू शकते.

सीएसीपीने रब्बी पिकांसाठी ३ ते ९ टक्क्यांपर्यंत एमएसपी वाढवण्याची शिफारस केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून चर्चा करून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गहूसोबत सरकार ६ वेगवेगळ्या पिकांसाठी एमएसपी तयार करत आहे. डाळींवरील एमएसपी सर्वात जास्त वाढण्याची शक्यता आहे. गहू, चणा-मसून, मोहरी, सूर्यफुलावरील एमएसपी निश्चित करण्यात आला आहे.

एमएसपी म्हणजे काय?
पिकाची जी आधारभूत किंमत ठरवली जाते त्याला एमएसपी असं म्हणतात. ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्यांच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देतं त्याला एमएसपी म्हणतात.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *