मुंबई : माओवादी कनेक्शन प्रकरणी जीएन साईबाबा यांच्यासह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. कोर्टाने अखेर नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे.
माओवादी चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर काही तासात महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta