मुंबई : ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे आज सोमवारी ५ जुन रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचा सहकारी कलाकार सुरेंद्र पाल यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला.
गुफी यांची तब्येत बिघडली तेव्हा ते फरिदाबादला होते. त्यांना प्रथम फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर मुंबईत आणण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री टीना घईने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते.
Belgaum Varta Belgaum Varta