Tuesday , March 3 2026
Breaking News

कुपवाडात मोठी कारवाई; चकमकीत ५ परदेशी दहशतवादी ठार

Spread the love

 

जम्मू : कुपवाडा येथील जुमागंड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये आज (दि.१६ जून) सकाळी चकमक झाली. या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. हे सर्व दहशतवादी परदेशी असून, शोधमोहिम सुरू आहे, अशी माहिती काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे.

यापूर्वी चकमकीत २ दहशतवादांचा खात्मा
यापूर्वी 13 जून रोजी कुपवाडा जिल्ह्यातील सीमा भागात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ही कारवाई कुपवाडा जिल्ह्यातील डोबानार मच्छल भागात (एलओसी) करण्यात आली होती.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *