Friday , March 6 2026
Breaking News

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन

Spread the love

 

मुंबई : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ वर्षी निधन झाल्याची बातमी आहे. पद्मश्री पंकज उधास यांची कन्या नायब उधास यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंकज उधास हे अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होते.

त्यांच्या निधनाची माहिती त्यांची कन्या नायब उधास यांनी दिली आहे. आज सकाळी अकार वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलीने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला कळवावे लागते की, पद्मश्री पंकज उधास जी यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.” मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *