Friday , November 22 2024
Breaking News

बस ५० फूट खाणीत कोसळून भीषण अपघात, १२ मजुरांचा मृत्यू

Spread the love

 

दुर्ग : बस ५० फूट खाणीत कोसळून अपघात झाला आहे. या बस अपघातात १२ मजुरांचा मृत्यू झाला. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये ही घटना घडली आहे. दुर्गमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने बस ५० फूट खोल खाणीत कोसळली आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

काय घडली घटना?
छत्तीसगडच्या रायपूर-दुर्ग मार्गावर हा अपघात झाला. मंगळवारी रात्री ५० कर्मचारी ज्या बसमध्ये बसले होते त्या बसचा अपघात झाला. या अपघातात १२ मजूर ठार झाले. तर २० हून अधिकजण जखमी झाले. या सगळ्यांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे अशी माहितीही समोर येते आहे.

दुर्ग जिल्ह्यातील केडिया डिस्टिलरीच्या सुमारे ५० कर्मचाऱ्यांना घेऊन कुम्हारीहून भिलाईला परतणारी बस मंगळवारी रात्री ९ वाजता ५० फूट खोल दरीत कोसळली. या बस अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. काही जणांना प्राथमिक उपचारासाठी धमधा आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ४० कर्मचारी प्रवास करत होते. या भीषण बस अपघातात २० हून जास्त मजूर जखमी झाले असून काही गंभीर जखमींना रायपूरला पाठवण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींनी एक्स मीडियावर ट्वीट करत लिहिलं आहे की, छत्तीसगडच्या दुर्गमधील बस दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी, अशा सदिच्छा व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love  जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *