अध्यक्षपदी सुनील शेवाळे : उपाध्यक्षपदी यास्मिन मुल्ला
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर शिक्षक को. ऑप. क्रेडिट सोसायटीची सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक निवडणुकीत नूतन संचालक आणि पदाधिकाऱ्याची निवड बिनविरोध निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष म्हणून हरी नगर शाळेचे शिक्षक सुनील शेवाळे तर उपाध्यक्षपदी यास्मिन मुल्ला यांची निवड करण्यात आली.
वाय. के. तोळण्णावर, एस. एस. मिर्जी, व्ही. जी. माने, एम. एस. खराडे,. एम.बी. जनापुरे, ए.ए मुल्ला, एस.एम. शेवाळे, वाय.आर. मुल्ला, पी.पी. कांबळे, एम.के. पाटील, डी.एम. कांबळे, एस.एम. भुसानी, सी.एम. पुजारी या सर्व संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व संचकांच्या वतीने नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. ही निवडणुक प्रक्रिया बेळगाव येथील जिल्हा निबंधक के. एम. शिरहट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एस. एस. तावदारे, दंडीनावर, मुजावर, पाटील, कांबळे यांच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. संस्थेचे सेक्रेटरी आर. के. कुरणे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta