लक्ष्मण चिंगळे : मराठा समाज वधू वर मेळावा
निपाणी (वार्ता) : पूर्वीच्या काळी नातेवाईक आणि नातेसंबंधातून विवाह जुळून येत होते. पण सध्या मुलींची संख्या घटत चालल्याने वर पालकांना मुलींना शोधणे कठीण जात आहे. वधू- वर पालक मेळावे भरविले जात आहेत. सध्या जातीची मर्यादा राहिलेली नाही. महाराष्ट्र कर्नाटकासह इतर राज्यातून वधू -वर पालक मिळावे होत आहेत. त्यामध्ये पारदर्शकता ठेवून काम करणे आवश्यक आहे म्हणून जुळवण्याचे काम श्रेष्ठ असून लग्नाचे वेळेचे बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे. तसेच आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करावे, असे आवाहन चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी केले. रविवारी (ता.१३) येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित मराठा समाज वधू- वर पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. दादासाहेब खोत यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला. यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर वधू-वर पालक मेळावा झाला. या मेळाव्याला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार झाला.
यावेळी प्रसन्नकुमार गुजर, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, माजी सभापती संदीप कामत, सागर मिरजे, बाळासाहेब कदम, दत्ता मानके, बंडा घोरपडे, लक्ष्मण लोकरे, विश्वनाथ जाधव, उदय शिंदे यांच्यासह विविध गावातील वधू-वर पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta