पटकावले एक लाखाचे बक्षीस : सिल्वासा संघ उपविजेता
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निपाणी फुटबॉल अकॅडमीच्या सहकाऱ्यांने गुरुवारी (ता.१७) झालेल्या ‘अरिहंत चषक’ फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात सिल्वासा संघाला ४-० फरकाने हरवून कोल्हापूर येथील बालगोपाल संघाने विजय मिळवला. त्यामुळे या संघाने रोख १ लाख रुपये व चषक पटकावले. तर सिल्वासा युनायटेड संघाने चांगली कामगिरी करूनही संघातील खेळाडूला दुखापत झाल्याने त्यांना उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. त्यांना रोख ७५ हजाराचे बक्षीस व चषक देण्यात आले. बालगोपाल संघाचे खेळाडू राहुल पाटील व परमजीत सिंग या दोन खेळाडूंनी चांगला खेळ करून हा सामना जिंकून दिला. दोन्ही संघांनी रोमार्षक खेळी केली.
विजया नंतर कोल्हापूर संघाने जल्लोष केला. विजेत्या संघांना बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, धनंजय मानवी, नगरसेवक संजय सांगावकर, निरंजन पाटील सरकार व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
गुरुवारी (ता.१७) झालेल्या उपांत्य फेरीत सकाळी दिव दमन संघ विरुद्ध बेळगाव ब्रदर्स या संघात पहिला सामना झाला. दोन्ही संघात बरोबरीची केळी झाल्याने पेनल्टी डावावर ५-४ फरकाने दिव दमण संघाने हा सामना जिंकला. दुसरा सामना कोल्हापूर बाल गोपाल विरुद्ध गडहिंग्लज के बी आर संघात झाला. त्यामध्ये कोल्हापूर संघाने १-० गुणांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सामन्यात नाणेफेक करून गडडिंग्लज के बी आर संघाने तृतीय क्रमांकाचे २५ हजाराचे बक्षीस व चषक मिळवले. तर बेळगाव ब्रदर्स संघालाही २५ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय अंतिम फेरीतील विजेत्या व उपयोजित्या संघातील खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी पृथ्वीराज पाटील, डॉ. सुनील ससे, नगरसेवक संजय सांगावकर, अभय मगदूम, अनिल गुरव, राजू पाटील- अकोळ, प्रकाश गायकवाड, निवास पाटील, नगरसेवक डॉ. जसराज गिरे, शौकत चेतन स्वामी, निरंजन पाटील -सरकार, गजानन कावडकर, अरुण निकाडे, शिवगोंडा पाटील, दत्ता नाईक, सचिन पोवार, रघुनाथ चौगुले, दिलीप पठाडे, इम्रान मकानदार, शिरीष कमते, अशोक बंकापुरे, राजेंद्र बन्ने, शौकत मनेर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आशिष भाट यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta