निपाणी (वार्ता) : यरनाळ येथे ग्रामपंचायत डिजिटल ग्रंथालय आणि माहिती केंद्र यरनाळ यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेमध्ये कन्नड माध्यम व मराठी माध्यमातील सहावी व सातवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता..
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून वितरण करण्यात आले.
यरनाळ ग्रामपंचायत विकास अधिकारी गायत्री टोणे म्हणाल्या, ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र आहे, शालेय शिक्षणाबरोबरच विविध ग्रंथ साहित्याच्या माध्यमातून बौद्धिक विकास साधला जातो, यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी ग्रंथालयाला भेट देऊन ज्ञानार्जन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
ग्रंथपाल गोरखनाथ मधाळे म्हणाले, ग्रंथालयाच्या माध्यमातून आजपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना विविध साहित्य, काव्य, महाकाव्य कविता, कथा, पौराणिक कथा इत्यादी विषयी माहिती ग्रंथालयाच्या माध्यमातून मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास समरसिंह निंबाळकर, कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी बरगले, मराठी शाळेचे शिक्षक श्रीकांत तावदारे. ग्रंथपाल गोरखनाथ मथाळे, यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta