निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील राणी चन्नमा विद्यापीठाच्याअंतर्गत येणाऱ्या बेळगाव येथील केएलई संस्थेच्या निपाणी येथील जी. आय. बागेवाडी महाविद्याल एनएसएस विभागास डॉ. एस. एम. रायमाने यांना अत्योत्तम विभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अत्योत्तम एन एस एस स्वयंसेवक पुरस्कार शशिधर गुरव यांना देण्यात आला.
2021 व 22 या वर्षासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुयंपू सभाभवनात झालेल्या कार्यक्रमात राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलपती प्रा. एम. रामचंद्रगौडा व भारत सरकार एन एस एस घटकाचे संयोजक अधिकारी के. व्ही. नरसिंहा, आरसीयु विद्यापीठाचे कुलासचिव के. टी.
शांतला आणी भारत केंद्रसरकाचे युवा संयोजना अधिकारी एम. उपीन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.जी आय बागेवाडी महाविद्यालयात गेल्या पाच वर्षांत एन एस एस घटकांकडून अनेक वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले होते. निपाणी तालुक्यातील ठिकाणी रामपूर, गव्हाणी, चिखलवाळ, आणि कुरली अशा ग्रामीण भागात एन एस एस चे विशेष शिबिर आयोजन करून व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, रंगमंच व अभिनय कला प्रवृत्त कार्यक्रम सादर केले होते त्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta