युवा नेते उत्तम पाटील : ममदापुर येथे अरिहंत उद्योग समूहकडून योध्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाने क्षेत्रातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी युवकांनी स्वतःला सैन्य दलात समावुन घेणे ही काळाची गरज आहे. योध्यांची सेवा ही देशासाठी अनमोल आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. ममदापुर येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
ममदापुर येथील दोन युवकांनी आपल्या परिस्थितीनुसार, अथक परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दलातील इंडियन आर्मीमध्ये श्रेयस संभाजी पाटील, व निरंजन नेजे यांची निवड झाली आहे. अशा गुणी मुलांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महारुद्र स्वामी, ममदापुरचे निरंजन पाटील (सरकार), गजानन कावडकर, वसंतराव पाटील, प्रकाश पाटील, डॉ. सुहास पाटील, रावसाहेब गोरवाडे, मोहन पाटील, महादेव मधाळे, संभाजी पाटील, पांडुरंग हरेल, उत्तम दादू पाटील, विकास चौगुले, मधुकर उत्तुरे, संदीप तोडकर, शेखर पाटील, गुंडू पाटील, आन्नासो पाटील (एक्स आर्मी), आप्पासो पाटील, बाळासो हरेल, अरुण चौगुले, संभाजी नेजे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta