Thursday , March 5 2026
Breaking News

संविधान हे विकासाची संधी देणारे तत्त्वज्ञान

Spread the love
संचालक महावीर पाटील : स्तवनिधी शाळेत संविधान दिन
निपाणी : संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर जगण्याचा आधार आहे. नागरिकांना शाश्वत विकासाची संधी देणारे ‘शाश्वत तत्वज्ञान’ आहे, असे स्तवनिधी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी मांडले. बाहुबली विद्यापिठ  संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधान दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक माणिक शिरगुप्पे यांनी, भारतीयांना जगण्याचे मूलभूत मानवी हक्क प्रदान करणारे भारतीय संविधान आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची ती सर्वोच्च संपत्ती आहे. तिचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. एम. बी. कोल्हापुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी ज्योती कोरडे यांनी स्वागत केले. यावेळी या व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे पूजन झाले. प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. एस. एस. तेरदाळे  यांनी सूत्रसंचालन केले. एन. डी. तेलगडी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *