कार्यकर्त्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सातत्याने सामाजिक परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून माध्यमातून सातत्याने बहुजन समाजातील तरुणांना महापुरुषांच्या सामाजिक समतेच्या विचाराच्या माध्यमातून दिशा मिळावी, यासाठी विचार संमेलन भरविले जात आहे. विविध जाती धर्मामध्ये सामाजिक एकोपाची व समतेची बीजे रोवली जावी व समाज गुण्यागोविंदाने राहावा हा उद्देश आहे. त्यासाठी यंदाही २५ डिसेंबर रोजी फुले शाहू आंबेडकर विचार संमेलन भरवले जाणार असल्याची माहिती डॉ. आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
जात, धर्म, पंथ, भाषा या पलीकडे जाऊन समाजाची जडणघडण व्हावी. समाजातील शोषित वंचित बहुजन शेतकरी कष्टकरी कामगारांना स्वाभिमानी जीवन जगता यावे, या भावनेतून डॉ. आंबेडकर विचार मंच निपाणी परिसरामध्ये २४ वर्षे सातत्याने समाजाला एक वैचारिक दिशा मिळावी या हेतूने कार्यरत आहे.
समाजातील सर्वसमावेशक आणि अराजकीय अशा स्वरूपात देशातील विविध विचारवंतांना पाचारण करून वेगवेगळ्या प्रकारचे विचार समाजाला ऐकवण्याचे काम सातत्याने करीत आहे. सद्यस्थितीत निपाणी परिसरात एक वेगळ्या प्रकारचे सामाजिक वातावरण दूषित करण्याचे काम होत आहे. समाजाला एकसंघ ठेवण्याचे आव्हान डॉ. आंबेडकर विचार मंचने स्वीकारलेला असून सामाजिक परिवर्तनाला गतिमान करून समता निश्चित समाज व्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय बाळगले आहे. त्यामुळे २५ डिसेंबर रोजी फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन घेण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
संमेलनासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनाला समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी पाठिंबा देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी केले. संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
बैठकीस अमित शिंदे, रमेश कांबळे, पिंटू माने, अविनाश माने, रतन पोळ, प्रवीण माने, संदीप माने, कुमार मेस्त्री, प्रवीण सौंदलगे,विकास मेस्त्री, प्रकाश मधाळे, सातापा कांबळे, राहुल मेस्त्री, गिरिधर ढोबळे, मकरंद कसबेकर, राहुल भोसले, किसन दावणे, अशोक लाखे, सर्जेराव हेगडे, दीपक वराळे,प्रशांत मधाळे, प्रतीक मधाळे विजय कांबळे, प्रणित घस्ते अभिषेक माने शुभम कांबळे यांच्यासह निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta