कोगनोळी : कोगनोळी हंचिनाळ रस्त्यावर शनिवारी पहाटे ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टर बैलगाडी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे नेहमीप्रमाणे ऊसतोड मजूर आपल्या कामगारांच्यासह ऊस तोडण्यासाठी जात होते.
यावेळी रस्त्यातील खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅक्टर रस्ता सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारी मध्ये जाऊन अडकला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
या रस्त्यामुळे काही लोकांचे बळी सुद्धा गेलेले आहेत. सदर रस्त्याच्या दुरुस्ती अथवा नूतनीकरणाबाबत येत्या पंधरा तारखेपासून उपोषणही केले जाणार आहे. प्रशासन मात्र या गोष्टीकडे गांभीर्याने का पाहत नाही. असा सवाल आता प्रवासी, नागरिक, विद्यार्थी, व्यापाऱ्यांच्यातून उपस्थित केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta