निपाणी (वार्ता) : आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था (भारत) या संघटनेचे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन हिवाळी अधिवेशन २०२२ आकुर्डी पुणे येथे पार पडले. त्यामध्ये शिप्पूर येथील सेवानिवृत्त जवान बाळकृष्ण पाटील यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बाळकृष्ण पाटील यांनी पाणी अडवा पाणी जिरवा, गावातील तळ्याची स्वच्छता, वृक्षारोपण अशी सामाजिक कार्य केले आहेत. गेली पाच वर्ष किल्ले आणि निसर्ग संवर्धन सेंद्रिय शेती विषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कोरोना काळात दिल्ली येथे 2000 हजार झाडांचे वृक्षारोपण रक्तदान शिबिर.गावात स्वच्छता अभियान राबवली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. विठ्ठलरावजी जाधव,महानगरपालिकेच्या माजी महापौर उषा ढोरे, प्रादेशिक वनीकरणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, आंतरराष्ट्रीय साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा संगिता शिंदे, प्रदिप शेळके, विजय बोत्रे, गोदान चळवळ भारतचे संस्थापक मुबारक शेख, अरुण कांबळे, पेमगिरी स्वराज्य संकल्प भूमी या पुस्तकाचे लेखक रोहित डुबे पाटील, बी. आर. घोलप प्रा.भास्कर घोडके, आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे, राष्ट्रीय सचिव दिपक काळे, आंतरराष्ट्रीय सचिव सौरभ हजारे, संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सांप्रदाय विभाग अध्यक्षा पुनमताई जाचक, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष बाबासाहेब मंडलिक तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य नियोजन समितीचे वरिष्ठ पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य विभागीय पदाधिकारी, संस्थेचे जिल्हे व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta