माजी मंत्री विरकुमार पाटील : अपप्रचाराला बळी पडू नका
निपाणी (वार्ता) : कोणत्याही अप्रचाराला बळी पडू नका. २०२३च्या विधानसभा निवडणूकीसाठी काकासाहेब पाटील हेच उमेदवार असणार असल्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी स्पष्ट केले. यरनाळ येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
वीरकुमार पाटील म्हणाले, काही लोक फक्त जाहिरातबाजी करून विकास कामे केल्याचे दाखवत आहेत. पण वास्तविक पाहता कोणताच विकास कामे १० वर्षात झालेली नाहीत. नाही. फक्त फोटो काढून विकास होत नसतो तर त्यासाठी सामान्यांची कामे करण्यासाठी माणसाची तळमळ असली पाहिजे.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, आतापर्यंत यरनाळ गावाने मला कायमच साथ दिली आहे. माजी आमदार रघुनाथदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार असतेवेळी यरनाळ गावाला जोडणारे व यरनाळहून दुसऱ्या गावाला जोडणारे अशक्य असे रस्ते लोकआग्रहास्तव तयार करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून बहुग्राम पाणी योजना चालू केली. सुवर्ण ग्राममधून गावातील सर्व रस्त्यासह विविध कामे केली केली आहेत. विरकुमार पाटील मंत्री असतेवेळी डोंगर भागातील सर्व गावात विज जोडणी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव २०२३ची निवडणूक मी पुन्हा लढणार आहे.
यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास निपाणी ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष अन्वर हुक्केरी, अशोक पाटील, किसन देसाई, दिनकर लकडे,संभाजी गायकवाड, सागर लाटकर,आण्णासो खोत, नेताजी पोवार, अवधूत पोवार, संतोष पोवार, उत्तम पोवार, रायागोंडा पाटील, दादू पोवार, सदाशिव लकडे, कपिल लकडे, मयूर लकडे, बाळू एवाळे, बाळू शेळके, बाबुराव डावरे, सचिन चव्हाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta