निपाणी (वार्ता) : मार्गशीष पोर्णिमेचे अवचित्य साधून ‘लाईट हाऊस फाऊंडेशन’ व ‘भिससंदेश युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राहूल मुगळे यांच्या सैजन्याने आंबेडकर नगरात शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसुर , ॲड. आर. बी. थरकार यांच्या हस्ते बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी, आपल्याला स्वावलंबी व सक्षम व्हायच असेल तर शिक्षणाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पथदिपाच्या दिव्याखाली बसून अभ्यास केल्याने देशासाठी संविधान लिहू शकते आहेत. त्यांचा आदर डोळ्यासमोर ठेवून समाजातील लोकांनी वाटचाल करण्याचे आवाहन केले. ॲड.थरकार यांनी, संविधानाची उद्देशीका आणि विविध कलमांवर मार्गदर्शन केले.
प्रारंभी बुद्धमुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. राहुल मुगळे यांनी स्वागत केले. कपील कांबळे यांनी बुद्धवंदना घेतली. पुंडलीक कांबळे, महेश धम्मरक्षीत, सागर जाधव, प्रशांत कांबळे कपील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित बक्कन्नावर, विकी कांबळे, श्रावण चौगुले, रोहित घस्ते, ओमकार कांबळे, प्रशांत कुरणे, शुभम चौगुले, ओकार मुगळे, संकेत चौगुले, प्रतिक मुगळे, विकि शिंदे, योगेश कुरणे, दस्तगीर शेख, सचिन माळी, विश्वास माळी, जयशिंग कांबळे, संभाजी मुगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थितीत होते. सागर कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta