डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत विजयोत्सव
निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे महानगर पालिकेतील भाजपची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आम आदमी पक्षाने १३४ आशा मोठ्या संख्या बळाने सत्ता स्थापन केली. दिल्ली येथे सर्व स्तरावर परिवर्तनास सुरवात झाली आहे. दिल्ली येथील नागरिकांना आम आदमी पक्षाच्या स्वच्छ कारभाराचा ८ वर्षांपासून चा अनुभव असल्याने निवडणुकी मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाच्या हातामध्ये सत्ता सोपविली. हे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालविल्याचे प्रशस्ती पत्रच आहे, असे मत डॉ. राजेश बनवन्ना यांनी व्यक्त केले. येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात आम आदमी पक्षा तर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. बनवन्ना म्हणाले, गुजरातमध्ये लाखापेक्षा अधिक मतदान आपला मिळाले आहे. तर आम आदमी पक्षाला ५ जागा मिळाल्या व जवळजवळ १२ जागा खूप कमी फरकाने गमवाव्या लागल्या. गुजरात भाजपाचा बालेकिल्ला असून तिथे हे यश आम आदमी पार्टीला मिळाले. ते कौतुकास्पद आहे. या मताधिक्यामुळे आम आदमी पक्ष हा आता राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित झाला. अशीच विजयाची व भ्रष्टाचार मुक्त देश बनवण्याची घोडदौड आम आदमी पक्ष, जनतेच्या मदतीने करीत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आदर्श गिजवणेकर, कांचन बिरनाळे, वासीम पठाण, महेश कंगळे, मिताली कंगळे, हसन मुल्ला, पंकज कांबळे, प्रकाश पोळ, शंकर चौगुले, कृष्णा दळवी, राजू हिंग्लजे, नंदकिशोर कंगळे, अक्षय कार्वेकर, यासिन बागवान, संतोष पाटील यांच्यासह आपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta