बोरगाव उरुसानिमित्त आयोजन : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदारशा यांच्या उरुसानिमित्त हिंदू मुस्लिम उरूस कमिटीच्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यतीत कोल्हापूर येथील सुरेश सरनाईक यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक मिळवून १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळविले.
युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शर्यत मैदानाचे उद्घाटन झाले.
जनरल बैलगाडी शर्यतीत दिनेश उगळे- कारदगा यांची द्वितीय व बंडा शिंदे- दानोळी यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवले. यांना अनुक्रमे १० हजार १ व ७ हजार १ रुपयांचे बक्षीस व निशाण देण्यात आले.
बैल- घोडा शर्यतीत अभय गोरवाडे- बोरगाव प्रथम, दिलूभाई -कुंभोज द्वितीय व समरजीत जगदाळे-शिरोळ यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवले त्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
घोडा- गाडी शर्यतीत अमोल निकम- बोरगाव, शिवाजी निकम -बोरगाव गोमटेश चौगुले -बोरगाव यांच्या गाडीने अनुक्रमे क्रमांक मिळवले. त्यांना ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
शर्यत व्यवस्थित पार पाडण्यासाठी आप्पासाहेब शेख, बबन निकम, चांद साहेब अपराज, शिवाजी निकम, इरफान शेख यांनी परिश्रम घेतले.
यावेळी नगरसेवक प्रदीप माळी, तुळशीदास वसवाडे, अशोक माळी, तात्यासाहेब बसन्नवर, मायगोंडा पाटील, शिवाजी तोडकर, सुमित रोड्ड, संजय पोवार, आप्पालाल शेख, बाबू निकम, सिकंदर अफराज, तुफान अफराज, भैय्या अफराज, शिवाजी निकम, अमोल निकम संगप्पा ऐदमाळे, इरफान अफराज यांच्यासह उरुस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta