निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनतर्फे शिक्षण क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबद्दल निपाणी येथील मनिषा सुनील शेवाळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथील मुख्याध्यापक हाॅलमध्ये पार पडला.
मनीषा शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावे. समाजासाठी विद्यार्थ्यांचे कार्य यासह विविध विषयावर त्या निरंतरपणे मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी साई उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पाटील-कौलवकर, कोल्हापूर येथील क्रांती सूर्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल मोरे, सचिव हर्षदा परीट, डॉ. पांडूरंग, डॉ. शैलजा बुरूटे, धनाजी ढोबळे, डी. बी.कांबळे शिक्षणाधिकारी डी. डी. शिंदे, सुनील शेवाळे, संगीता निंबाळकर, हर्षवर्धन भोसले, बाबासाहेब पाटील, मनीषा नाईक, संग्राम भोसले, सनी आवटे, नितीन आवटे धनंजय, शिंदे, अक्षय ढोबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta