Sunday , December 14 2025
Breaking News

चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Spread the love

 

१४ वर्षाखालील खेळाडू :१२ संघांचा सहभाग

निपाणी (वार्ता) : येथील चॅलेंजर स्पोर्टस् अँड युथ क्लब व समर्थ व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. ७) डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी व धनंजय मानवी यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १२ संघांचा समावेश असून ही स्पर्धा १५ दिवस चालणार आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते यष्टी पूजन झाले. त्यानंतर डॉ. कुरबट्टी यांनी, खेळाडूंनी हार, जीत न मानता चांगली खेळी केली पाहिजे. खेळामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते. त्यामुळे युवकांनी खेळाकडे वळणे आवश्यक असल्याचे सांगितले. धनंजय मानवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
लेदरबॉल आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत निपाणी, बेळगाव, सावंतवाडी,सांगली, गडहिंग्लज, चिकोडी, कोल्हापूरसह इतर संघांचा सहभाग आहे. विनायक माने, प्रणव शंपुकडे हे पंच म्हणून कार्यरत आहेत. विजेत्या संघांना ट्रॉफी तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध पदके दिली जाणार आहेत. सावंतवाडी अनिल नाईक क्रिकेट अकॅडमी आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लब यांच्यात उद्घाटनाचा सामना झाला.
यावेळी दीपक दुमाले, प्रथमेश लोहार, विनायक कांबळे, मोहन चव्हाण, जावेद गवंडी, विनायक महाजन, एस. बी. महाजन, अबू भडगावकर, राहुल माळवे, जावेद गवंडी साजिद कादरी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रयत’ ची विधानसभेला धडक निपाणीत चाबूक मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *