कोगनोळी : येथील बाळासाहेब पाटील बनाप यांची नात आराध्या पद्मराज पाटील या चिमुकल्या मुलीला कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा बाल क्रीडा गौरव पुरस्कार देऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
२६ जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शाहू स्टेडीयम येथे कोल्हापूर जिल्ह्यातील “कला, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुला, मुलींचा गौरव करण्यात आला.
स्केटींग क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरच्या आराध्या पद्मराज पाटील वय वर्ष फक्त ३ वर्ष १० महिने हिने भर मुसळधार पावसात व विजेच्या कडकड्यात ४१ मिनिटात ६ कि.मी.चे अंतर एकूण ७२ फेऱ्या मारुन नवा विश्वविक्रम करुन कोल्हापूर जिल्ह्याचे नाव केले. त्याबद्दल तिचा महाराष्ट्र शासन कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यातर्फे पालकमंत्री दिपक केसरकर, पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महानगरपालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, अधिकारी सुधाकर जमादार यांच्या हस्ते “बाल क्रीडा गौरव 2023 पुरस्कार देण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्वतःहून आराध्याला तिच्या कामगिरी बद्दल रोख ५००० रुपये बक्षीस देवून तिचे कौतुक केले. आराध्याला कोच सचिन इंगवले यांच्याकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले.
कोगनोळी येथील प्रसिध्द डॉक्टर बाळासाहेब पाटील, पुष्पा पाटील तसेच जमखंडी कारखान्याचे संचालक पद्मन्ना जकनूर, शोभा जकनूर यांची नात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta