Share

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर शेतकरी पेट्रोल पंपाजवळ अपघातात आयशर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख 4 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शामराव रामू भोगत (वय 40) कोवाड चंदगड असे मृत चालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फरशी वाहतूक करणारा कंटेनर मुंबईहून बेंगलोरकडे जात होता. येथील शेतकरी पेट्रोल पंपाजवळ आल्यावर कोल्हापूरहून चंदगडकडे जात असलेल्या आयशरची पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये चालक जागीच ठार झाला. तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळी निपाणी मंडल पोलीस निरीक्षक एस सी पाटील, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रमेश पोवार, राजू गोरखणावर, शेखर असोदे, एएसआय एस ए कभार यांनी भेट देऊन पाहणी करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.

Post Views:
1,255
Belgaum Varta Belgaum Varta