

मंत्री शशिकला जोल्ले : स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. त्यांच्यामुळेच आपण मंत्रीपदापर्यंत पोहोचून आतापर्यंत निपाणी मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. या कामासह शिक्षणालाही महत्त्व देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या निकालात काढल्या आहेत, असे मत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. मूडबद्री येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि क्रीडा महोत्सवात येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील २०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील ६० स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना राज्यपाल पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त जोल्ले उद्योग समूहातर्फे त्यांचा येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात सत्कार करण्यात आला. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.
मंत्री जोल्ले म्हणाल्या, सीमाभागात शिक्षणाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अनेक सुविधा उपलब्ध केल्या कोटी रुपये खर्चून तवंदी येथे मोरारजी वस्ती शाळा, अंजना येथे मुलींच्या साठी ७.५० कोटी रुपये खर्चून वस्ती शाळा, सरकारी शाळांना २६.३२ कोटी रुपये, शाळांच्या दुरुस्तीसाठी २.९ कोटी रुपये, निपाणीत २.५० कोटी रुपयाचे आयटीआय कॉलेज, अकोला येथे २ कोटीची आयटीआय कॉलेज, निपाणीत डिग्री कॉलेज, उर्दू हायस्कूल अशी कोट्यावधीची कामे केली आहेत. यापुढील काळातही मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या भागात शैक्षणिक क्रांती करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भास्कर स्वामी, सईद कीर्तने, अरुंधती घाटगे, गौरीशंकर तोरसे, अस्मिता बामणे, अथर्व जोनी, एल.बी. बिरादार- पाटील यांच्यासह विद्यार्थी पालकांनी मनोहर व्यक्त केले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले. गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी स्वागत तर स्काऊट गाईड मास्टर संतोष मगदूम यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, उदय नाईक प्रणव मानवी, दैहीक गटशिक्षणाधिकारी एस.पी. जोगळेकर, सुनील शेवाळे, आर. ए. कागे, वाय. बी. हंडी, टी. एम. लोकरे, एस. आर. मगदूम, एस.एम. पांडव, बंडा घोरपडे यांच्यासह निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. बाहुबली लखन्नावर यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta