वाळकी ग्रामस्थांची मागणी : ११ टक्के व्याज आकारण्याचे निर्देश
निपाणी (वार्ता) : वाळकी (ता. चिकोडी) येथील ग्रामस्थांनी घरकुल गैरव्यवहार करणाऱ्या इसमावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यास अनुसरून तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील प्रिया प्रकाश पाटील यांच्याकडून लाटण्यात आलेली रक्कम ११% व्याज आकारून परत घेण्याचे निर्देश दिले आहेत. तथापी, वाळकी ग्रामस्थांनी सदर पत्राबाबत असमाधान व्यक्त करीत बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रिया प्रकाश पाटील यांच्यावर कायद्याचा दुरुपयोग करून निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
याप्रकरणी शासकीय स्तरावर पाठपुरावा केलेले बिराप्पा मुधाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत याप्रकरणाच्या तपासाधिकाऱ्यांना तथ्य आढळून आले आहे. प्रिया प्रकाश पाटील यानी गृहनिर्माण योजना २०१०-११ च्या लाभार्थी आहेत. यासाठी ग्रामपंचायत कर्मचायांना जे घर दाखवले ते घर दुसऱ्याचे असल्याचे आढळून आले आहे. अशा पध्दतीने ७५,००० रुपयांचे घरकुल अनुदान लाटण्यात आले आहे. त्यामुळे घर न बांधता दुसऱ्याचे घर दाखवून शासकीय अनुदानाचा गैरवापर करणाऱ्या लाभाथ्र्यांकडून शेकडा ११% व्याज दराने वसुलीसाठी कारवाई केली जाईल. सदर अनुदान परत न केल्यास कर्नाटक जमिन महसूल कायद्यानुसार थकबाकी भरण्याकरीता कारवाई करण्यात येणार आहे. सदर माहिती तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी आणि तक्रारदार बिराप्पा मुधाळे, प्रिया प्रकाश पाटील यांना पाठविली आहे. तरीही तक्रारदार मुधाळे यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे मागणीचे निवेदन वरिष्ठांना दिले आहे.
दरम्यान, याप्रकरणी प्रिया प्रकाश पाटील यांनी घरकुल योजना राबवून सरकारची फसवणूक केल्याचू सिध्द झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अन्यथा याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष खंडेराव पाटील, सुजय पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अनिल नाईक, राहुल दोणे, महादेव पाटील, सुकुमार गोमाई, मारुती पाटील, किरण पाटील, यल्लाप्पा नाईक, कृष्णात घस्त, लक्ष्मण सुर्यवंशी, संजय तानाज, ज्ञानदेव कुमार, रमेश डोणे, भरमा नाईक, संतोष खोत, सागर खस्ते, सुनिल डोणे, अंकुश पाटील, संतोष तराळ, भाऊसो पाटील, नागेश नाईक यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta