Share
चार तोळ्यांचे सोन्याच दागिने : सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
निपाणी (वार्ता) : कुरुंदवाडहून आजराकडे जात असताना बोरगाव बस स्थानकावर महिलेची पर्स मधील सुमारे दीड लाख किमतीचे चार तोळ्यांचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना उघडकीस येताच संबंधित महिलेने आक्रोश केला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रेश्मा अस्लम शेख या गृहिणी आपल्या दहा वर्षाच्या मुलासोबत कुरुंदवाडहून आजराकडे बसने जात होत्या. प्रवासात बस बदलण्यासाठी बोरगाव बस स्थानकात उतरल्या असल्याने पुढे त्या निपाणी आगाराच्या बसमधून निपाणी मार्गे आजराकडे निघाल्या होत्या. दरम्यान गर्दीत आपले दागिने सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी सर्व दागिने बस स्थानकावरच आपल्याकडील पर्स मध्ये ठेवल्या. बस मध्ये चढत असताना चोरट्याने सदरची पर्स गर्दीमध्ये चोरून घेतली पुढे बस मधून काही अंतरावर गेल्या असता तिकीट काढण्यासाठी पर्स शोधताना सदर पर्स चोरीला गेली असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या महिलेने जागीच बस थांबवून हंबरडा फोडला.
दागिने चोरीला गेल्याने भयभीत झालेल्या या महिलेने बसमधील सर्व प्रवाशांची कसून चौकशी केली. पण दागिने मिळून आले नाहीत. त्यामुळे सदलगा पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबलने उपस्थिती दाखवून बस मधील प्रवाशांची चौकशी केली. पण दागिने सापडले नाहीत. शेवटी रेश्मा शेख यांनी आपल्या पतीना बोलावून सदलगा पोलीस ठाण्यामध्ये ४ तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवली आहे. पुढील उपनिरीक्षक भरतगौडा यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल पत्तार हे करीत आहेत.
Post Views:
577
Belgaum Varta Belgaum Varta