सौंदलगा : सौंदलगा परिसरात महाशिवरात्रीच्या निमित्त महादेव मंदिरात भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी.
सकाळपासून हर हर महादेव, ओम नमः शिवाय च्या जयघोषात भावीक, भक्तांनी शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. येथील महादेव मंदिरात सकाळी डॉ. सुहास कुलकर्णी, अश्विन कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत अभिषेक करून पूजा करण्यात आली. या अभिषेकाचे पौरोहित्य शशिकांत जोशी, प्रदीप जोशी, अंबादास बावडेकर, देविदास बावडेकर यांनी केले. या मंदिरातील विविध कार्यक्रमाचे नियोजन संजय बावडे यांनी केले. यानंतर भावीक भक्तांनी दर्शन घेण्यास सुरुवात केली होती.
याबरोबरच सरकारी शेती फार्म येथील महादेव मंदिरात, डोंगराजवळील माळी समाजाच्या महादेव मंदिरामध्ये, याबरोबरच आडी मल्लया येथील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. या दिवशी भाविकांनी दिवसभर उपवास धरला होता. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी विविध मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta