प्रारंभी महादेव मंदिराजवळ महोत्सव कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते उत्सव मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उत्सव मूर्तीची गांधी चौक, दलाल पेठ, जुने बसवेश्वर चौक पोलीस ठाणे, जत्राटवेस, चिक्कोडी रोड मार्गे पालखी मिरवणूक समाधी मठात पोहोचली. तेथे प्राणलिंग स्वामी व मान्यवरांच्या उपस्थितीत आरती व नैवेद्य दाखविण्यात आला. महाप्रसादनंतर दानम्मा देवी मंदिरमार्गे पुन्हा महादेव मंदिरात उत्सव मूर्तीचे आगमन झाले. यावेळी सुहासिनी महिलांनी ठिकठिकाणी पालखीला पाणी घालून उत्सव मूर्तीची ओवाळणी केली. तर दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.
यावेळी संजय मोळवाडे, अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, रवींद्र कोठीवाले, रवींद्र चंद्रकुडे, सुकुमार गुरव, संजय जाधव, रुपेश चंद्रकुडे, गिरीश यावगल, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, बाळू बाळेकनावर, प्रमोद तुकान, रोहित पाटील, सोमशेखर कोठीवाले, सुनील चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, अरुण भोसले, किरण भालेभालदार, बाबासाहेब साजनावर यांच्यासह भाविक उपस्थित होते.