कोगनोळी : हंचिनाळ (तालुका निपाणी) येथे रयत संघटनेच्या ४३ व्या शाखेचे उदघाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते झाले.
हंचिनाळ शाखाध्यक्ष मोहन नलवडे यांनी स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना राजू पोवार म्हणाले, आम्ही गेली २० वर्षे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे याद्वारे अहोरात्र झटत आहोत. मात्र देशातील व राज्यातील सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांच्या नावाने शपथ घेऊन सत्तेवर येतात आणि सत्तेच्या खुर्चीवर बसतात. मात्र शेतकऱ्याला विसरतात. शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यामध्ये भांडणे लावतात. आज ऊसाला दर मिळावा म्हणून गेली २ वर्षे आम्ही सरकार दरबारी प्रयत्न करत असून ऊसाला ५ हजार ५०० रुपये दर मिळावा ही आमची मागणी आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून आपली ताकद दाखवावी असेही राजू पोवार यांनी सांगितले.
यावेळी उमेश भारमल, रमेश पाटील, नितीन कानडे, तानाजी पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. सागर पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta