बेळगाव : मणगुत्ती ( ता. हुक्केरी) येथील द. म. शि. मंडळ संचलित लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. के. स्वामी होते.
प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी हसनेकर म्हणाले, आपण आपल्या भाषेचा नेहमीच गौरव करायला पाहिजे. आपल्या घरी आणि व्यवहारात मराठीचा वापर केल्यास भाषा समृध्द झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आर. ए. कामनगोळ, एस. एम. कोतेकर, बाळू मगदूम, आर.बी. शामणे आदी उपस्थित होते. एस. के. मेंडुले यांनी सूत्रसंचालन तर के. एम. राऊत यांनी आभारम मानले.
Belgaum Varta Belgaum Varta