
देवचंद महाविद्यालयात कला महोत्सव
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातर्फे आयोजित कला महोत्सवामध्ये केएलई सीबीएसईचा ३री चा विद्यार्थी श्रीनय सोमशेखर बाडकर याने स्टेज वरती रॅपिड आर्ट परफॉर्मन्स सादर केला.
एकादी कला कृती रेखाटायला बराच वेळ लागत असतो. पण यामध्ये त्याने त्याची कला सर्वां समोर फक्त ५ मिनिटात सादर केली. एकादे चित्र आपण सरळ पद्धतीने रेखाटतो. पण विशेष म्हणजे ही कला श्रीनयने उलट्या पद्धतीने रेखाटत तयार केली. आणि हेच कारण सर्व प्रेक्षकांचे आकर्षण बनले. त्यामुळे सर्व प्रेक्षक कुतूहलाने बघत होते.
श्रीनयने प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवले होते. कोणती कलाकृती बनून तयार होईल, असा प्रश्न प्रेक्षकांना पडत होता. आणि शेवटच्या क्षणात श्रीनयने आपली उलटी असलेली कलाकृती सरळ करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. त्याचा कलेतून एक प्रतिमा तयार झाली होती. आणि ती प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची होती.
स्टेजवरून आपली कलाकृती सरळ करताच प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात श्रीनयचे कौतुक केले. लहान वयात आत्मविश्वासाने नावीन्य पूर्ण अशी कलाकृती सादर केल्याबद्दल निपाणी कला महोत्सवाचे आयोजक टीमकडून देखील श्रीनयचे भेट वस्तू बक्षीस देऊन विशेष कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta