नगराध्यक्षांची भेट ; वेतन देणार सुरळीत
निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु आहे. या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी असली तरी सर्वच शिक्षक तळमळीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. काही शिक्षिकांना १३ हजार ६०० तर काहींना १ हजार वेतन आहे. काही शिक्षिकांचे १३ हजार ६०० पैकी ६ हजार ६०० रुपये परत रोखी मध्ये परत देत होते. याशिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी असन व्यवस्था नव्हती. शाळेची दुरुस्ती व्हावी, यासह विविध मागण्यासाठी शाळेतील शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर नगराध्यक्ष जयवंत भाटले व नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन वेतनसह इतर मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.
नगरपालिकेच्या या इंग्रजी माध्यम शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबाची मुले शिक्षण घेत आहेत. पण काही वर्गा मध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडी नाहीत. असलेली बाकडीही मोडकळीस आलीआहेत. शाळेत ८७० विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
कमी वेतन असलेल्या शिक्षिकांनी वारंवार वेतन वाढीसाठी मागणी करुणही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
काही वर्गामध्ये ७०-८० विद्यार्थी आहेत. त्यामुळे शिक्षिकांवर अन्याय होत आहे.
यावेळी मानव अधिकार संस्थेच्या नाज नफीस मुजावर, आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नगरपालिकेतील विरोधी गटाचे नगरसेवक आणि पालकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता.
अखेर नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजु गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर यांच्यासह नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आश्वासन दिले. त्यामुळे सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी नगरसेवक विलास गाडीवड्डर, डॉ. जसराज गिरे, शेरू बडेघर, शौकत मनेर, दिलीप पठाडे, अश्विनी बेल्लाद, यास्मिन नाईक, वर्षा धुमाळ, दिपाली शिंदे, मौला टीनमेकर, नवाज नाईक, मनीषा जाधव, आर. बी. देसाई, डॉ. उमेश बुद्धाचार्य, तनवीर जमादार, फिरोज जमादार, शैलेश बोधले, सुरेश पौवार यांच्यासह पालक शिक्षिका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta