निपाणी (वार्ता) : कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार आणिमाजी मंत्री विरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बसवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शेंडूर, गोंदुकुप्पी येथे ‘युथ जोडो, बूथ जोडो’अभियान राबविण्यात आले.
विविध बूथच्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाचे काम, विचार, ध्येय धोरणे तरुणांच्या पर्यंत पोहचवून तरुणांना संघटित करण्यात येत आहे. तसेच घरातील प्रमुख महिलांना दरमहा दोन हजार रुपये व घरातील 200 युनिट पर्यंत वीज मोफत, घरातील प्रत्येक व्यक्तीला दहा किलो तांदूळ फ्री देणार आहे या योजनेच्या गॅरंटी कार्डबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी निपाणी ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष अवधुत गुरव, निपाणी शहर अध्यक्ष प्रतीक शहा, जिल्हा सोशल मिडिया सेक्रेटरी अमृत ढोले, विशाल हजारे, विशाल डाफळे, गोपाळ सूर्यवंशी, पुंडलिक सूर्यवंशी, प्रथमेश सूर्यवंशी, अनिकेत चौगुले, राजू सुर्यवंशी, सचिन सुर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, दयानंद धामनेकर, सागर जाधव, सुशांत पाटील, अनिल माडेकर, तानाजी ढेरे, श्रीरंग जाधव
यांच्यासह युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta