निपाणीत मंत्री, खासदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात गुरव समाजाची संख्या लक्षणीय आहे. मात्र शासनाच्या अनेक सोयी सुविधांपासून हा समाज वंचित राहिला आहे. निदान यापुढे तरी गुरव समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच समाजातर्फे बेरोजगारांना प्रशिक्षण, विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यासाठी गुरव समाज भवन उभारणे आवश्यक आहे. तरी गुरव समाज भवनसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निपाणी तालुका गुरव समाज अभिवृध्दी संघाच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भातील निवेदन संघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना देण्यात आले.
गुरव समाजाने प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे धर्मजागृतीचे काम अखंडपणे केले आहे. अशावेळी या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकारचे सहकार्य महत्त्वाचे आहे. शासकीय योजनांचा समाजातील विद्यार्थी, बेरोजगारांना लाभ मिळावा तसेच समुदाय भवनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष राजू गुरव, सुनील गुरव, निवास गुरव, चंद्रकांत गुरव, अमर गुरव, नितीन गुरव, सुष्मिता गुरव, पूजा गुरव, शुभम गुरव, विवेक गुरव, बहादूर गुरव, भरत गुरव, शिवानंद गुरव, अनिल गुरव, निलेश गुरव, कलगोंडा गुरव, निवास गुरव, संजय गुरव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta